‘राजद्रोह’च्या आरोपाखाली अटक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काढले ‘कलम’, आरोपीने मानले आभार

रायपुर : वृत्तसंस्था – छत्तीसगढच्या राजनांदगावात १३ जूनला मांगेलाल अग्रवाल यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. त्यांच्यावर वीज कपाती विषयी सोशलमिडीयावर अफवा पसरवल्याचा आरोप लावण्यात आला. पण हा खटला नंतर काढून टाकण्यात आला. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शुक्रवारी मांगेलाल यांच्यावरील देशद्रोहाचा आरोप मागे घ्यायचे आदेश दिले.

राजनांदगाव पोलीस स्टेशनमध्ये वीज वितरण कंपनीकडून मांगेलाल यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला होता. त्यांना अटक करण्यात आली आणि नंतर त्यांना जामीन देण्यात आला. पोलिसांकडून त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान १२४ ए (देशद्रोह) आणि ५०५ (१) (बी) ( सार्वजनिक शांतता भंग करणे ) या कलमांद्वारे खटला दाखल करण्यात आला.

परंतू, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप केला आणि म्हंटले की सोशलमिडीयावर अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात येऊ नये. त्यांच्या विरोधात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला पाहिजे.

त्यांनी म्हंटले की, आम्ही व्यक्तीच्या विरोधात दाखल केलेला देशद्रोहाचा आरोप मागे घेतला आहे. माझं म्हणणं आहे की, बोलण्याचे स्वातंत्र्य पाहिजे आणि कोणावरही देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात येऊ नये. १२४ A काढून टाकले पाहिजे, हे काँग्रेसच्या घोषणापत्रात म्हंटले होते.

मुख्यमंत्री बघेल म्हणाले की, ज्यावेळी या प्रकरणाची मला माहिती मिळाली अगदी त्याच वेळात मी नाराजी जाहीर केली होती. कोणत्याही प्रकारची अफवा पसरवण्यासाठी सोशलमिडीयाचा वापर केला नाही पाहिजे. यासाठी वेगळा आयटी कायदा आहे. त्या कायद्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे.

https://twitter.com/ANI/status/1139694973064900608

या प्रकरणावर मांगेलाल म्हणाले की, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी माझी मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या भूमिकेमुळेच माझ्याविरुद्ध लावण्यात आलेले देशद्रोहाचा आरोप मागे घेण्यात आला.

सिने जगत –

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

‘या’ गोष्टींमुळे ‘परेशान’, ‘हैराण’ असतात एकटे राहणारे (सिंगल) ; हे आहेत उपाय, घ्या जाणून

Video : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’

Loading...
You might also like