छातीत लागली गोळी, गाडीचे दोन्ही टायर पंक्चर, तरीही त्यानं गर्लफ्रेंडला गुंडापासून वाचवलं !

रायपूर : वृत्तसंस्था – बिलासपूरमध्ये छातीत गोली लागलेली असतानाही एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीला तोंड बांधून (मास्क लावलेल्या) आलेल्या गुंडापासून यशस्वीरित्या वाचवलं आहे. युवकाच्या गाडीचे दोन्ही टायर पंक्चर झाले होते. तरीही त्यानं हार मानली नाही. तो जवळच्या रुग्णालयात पोहोचला. या तरुणाचं नाव विश्वजीत परीदा (22) आहे. त्याची सर्जरी झाली असून सध्या त्याची स्थिती चांगली आहे.

विश्वजीत आपल्या गर्लफ्रेड सोबत उसलापूर रेल्वे स्टेशन जवळच्या एका सुनसान जागी गेले होते. काही घडेल अशी शंका आल्यानं दोघेही तिथून निघत होते तेवढ्यात एका मास्क लावलेल्या माणसानं त्यांची वाट आडवली.

सदर प्रेयसीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं की, त्यानं पिस्टल रोखत जवळच्या तलावापाशी येण्यास सांगितलं. दोघांनी थोडं अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी त्याला विरोध केला. यानंतर त्या व्यक्तीनं गोळी झाडली जी थेट युवकाच्या छातीत लागली. तरीही त्याने प्रयेसीचा हात पकडला आणि आपल्या बाईकच्या दिशेनं धावला. यानंतर त्या व्यक्तीनं त्यांचा थोडासा पाठलाग केला आणि नंतर अंधारात गायब झाला.

मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी म्हटलं की, तो मास्क लावलेला व्यक्ती लुटायच्या हिशोबानं आला असेल. बिलासपूर एसपी प्रशांत अग्रावल यांनी म्हटलं की, “आयपीसीच्या कलम 307 (खुनाचा प्रयत्न) आणि आर्म्स अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

Visit : Policenama.com