अभिनेत्री छवि मित्तलच्या दोन महिन्यांच्या बाळाचा ‘अ‍ॅक्टींग डेब्यू’, ‘असा’ केला शुटींगला ‘सपोर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – युट्युबवरील प्रसिद्ध चॅनेल शिट आयडियाज ट्रेंडिंग(SIT)ची को फाऊंडर आणि अभिनेत्री छवि मित्तलने डिलिव्हरीनंतर शोमध्ये वापसी केली आहे. परंतु यावेळी सीरीजमध्ये छविसोबतच तिच्या दोन महिन्यांचे बाळ अरहम हुसेनचीही एंट्री झाली आहे. छविच्या दोन महिन्याच्या गोंडस अरहमचा SIT द बेटर हाफ सीजन ४ या वेब सीरीजमधून डिजिटल डेब्यू झाला आहे. १४ मे रोजी अरहमचा जन्म झाला आहे.

छविने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अरहमसोबतचे फोटो शेअर केले आहेत. शुटमध्ये अरहमसोबत खेळतानाचा सेटवरील पहिला फोटोही तिने पोस्ट केला आहे. फोटो शेअर करताना छवि आपल्या कॅप्शनमध्ये म्हणते की, “Little cutie ARHAM HUSSEIN with mommy @chhavihussein on the sets of his first ever shoot for @shittyideastrending. THE HOMECOMING! Link in bio. #littlearhamhussein”

सेटवरील अरहमसोबतचा पहिला फोटो शेअर केल्यानंतर छविने अरहमचा आणखी फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना छविने अरहमला सेटवर सपोर्ट करण्याबद्दल थँक्यू म्हटलं आहे. याशिवाय फोटोसोबत एक लांबलचक असं कॅप्शनही दिलं आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, छवि मित्तलने डिलिव्हरीनंतर महिन्याभरातच ऑफिस जॉईन केले होते. तिने मुलासोबतेच काही फोटोही आधी शेअर केले होते. छवि मित्तल युट्युबवरील SIT चॅनलची को-फाऊंडर आणि अ‍ॅक्ट्रेस आहे. तिने तीन बहुरानियां, तुम्हारी दिशा, घर की लक्ष्मी बेटीया, बंदिनी यांसारख्या अनेक मालिकेत काम केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या