कांद्यानंतर आता ‘अंड’ आणि ‘चिकन’ खाणं होणार ‘महाग’, ‘या’ कारणामुळं किंमती वाढू शकतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपलयाला चिकन खाण्याची आवड असेल तर आपल्याला आपला खिसा अधिक मोकळा करावा लागणार आहे. खरं तर, पोल्ट्री फीड (Poultry feed Maize) च्या किंमतीचा परिणाम पोल्ट्री उद्योगावर होत आहे. अंडी आणि कोंबडीच्या किंमती वाढविण्याबाबत कंपन्या विचार करीत आहेत. पोल्ट्री फीड मध्ये मका महत्वाची भूमिका बजावते. कारण मक्याचे धान्य कोंबडीला खाद्य म्हणून दिले जाते.

त्याचबरोबर, भारतातील मक्याच्या किंमतीत गेल्या एका महिन्यात १७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मुसळधार पाऊस व पुरामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर पावसाळ्यामुळे रब्बीची पेरणीही लांबणीवर पडली आहे. म्हणूनच डाळी, तेलबिया आणि भाज्यांचे दरही वाढत आहेत.

मक्याच्या वाढत्या किमतींमुळे पोल्ट्री उद्योगाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत:
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की मक्याचे दर नियंत्रणात येण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत. कारण मक्याच्या पिकावर फॉल आर्मी वर्म नावाच्या एका नवीन किडीने हल्ला केला आहे. यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

यावर्षी ७ लाख हेक्टरपेक्षा जास्त मका पीक नष्ट झाले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातही पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कर्नाटकात २६३ लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात २३२ लाख हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे.

गेल्या दोन महिन्यांत मक्याचे दर प्रतिक्विंटल १७०० रुपयांवरून २००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढले आहेत. म्हणजेच १७.६४ टक्के किंमती वाढल्या आहेत.

कोंबडी उत्पादनांच्या किंमतीत २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पोल्ट्री उद्योग व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. हवामानाचा परिणाम पिलांच्या वाढीवर झाला आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत १०-१५ टक्क्यांनी पुरवठा कमी होऊ शकेल. त्याच वेळी, चिकन फिडच्या किंमतीत झालेल्या वाढीचा फारसा परिणाम झाला नाही कारण त्या काळात चिकनची जास्त मागणी होती.

अंडी आणि चिकन या दोघांशी संबंधित व्यापारी तोट्यात असून दक्षिणेकडील राज्यांत किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्याने मका पिकाच्या किंमतीही वाढल्या आहेत.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/