‘पोल्ट्री फार्म’मुळे भविष्यात पसरू शकतो ‘कोरोना’पेक्षा भयंकर ‘साथी’चा रोग, वैज्ञानिकांचा दावा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – सद्यस्थितीत जगभरात कोरोना साथीच्या रोगाची परिस्थिती भयानक बनली आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या या प्राणघातक साथीमुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा वेळी नव्या अहवालाने जगाची चिंता वाढवली आहे.

एका वैज्ञानिक अहवालानुसार, कोविड 19 पेक्षा प्राणघातक साथीचा रोग अद्याप आलेला नाही. हा साथिचा रोग जागतिक लोकसंख्येच्या निम्मा भाग नष्ट करू शकतो, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. ‘हाऊ नॉट टू डाय’ या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक डॉ. मायकेल ग्रेगर यांनी असा दावा केला आहे की, पुढील महामारी ही कोंबड्यांमुळे येऊ शकते. जी कोरोनापेक्षा अधिक भयंकर असू शकते.

डॉ. ग्रेगर यांच्या मते, कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्म पासून हा व्हयरस पसरू शकतो, ज्यामुळे जगातील कोरोनापेक्षा जास्त मृत्यू होऊ शकतात. त्यांच्या ‘हाऊ टू सर्वाईव्ह अ पेंडेमिक’ या नवीन पुस्तकात शाकाहारी अमेरिकन पोषण विशेतज्ज्ञ मायकल ग्रेगर लिहतात की, पोल्ट्रीमुळे तयार होणारा विषाणू मानवासाठी कोरोना व्हायरसपेक्षा आणखी धोकादायक ठरू शकतो. ग्रेगर यांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत मनुष मांसाहारावर अवलंबून आहे आणि त्याचा वापर सुरु राहिल तोपर्यंत नवीन साथीचे रोग निर्माण होण्याची शक्यता राहील.

विशेष म्हणजे, कोविड 19 नावाचा हा विषाणू चीनच्या वुहानमधील मांस बाजारातून उद्भवला आहे. जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेला आणि तो जगभर पसरला. आतापर्यंत या विषाणूने 4 लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.