Chickenpox | ‘या’ हंगामात चिकनपॉक्स संसर्गाचा धोका वाढतो; जाणून घ्या त्याची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मार्चच्या उत्तरार्धात आणि साधारणत: एप्रिलच्या सुरुवातीला देशात चिकनपॉक्स (कांजण्या) संसर्ग वाढल्याची नोंद आहे. चिकनपॉक्स (Chickenpox) हा विषाणूजन्य संसर्ग असून, या विषाणूच्या वाढीसाठी हा ऋतू सर्वाधिक अनुकूल मानला जातो. चिकनपॉक्सला (Chickenpox) देशाच्या काही भागात देवीचा रोग म्हणूनही ओळखले जाते. ही समस्या व्हेरिसेला-झोस्टर विषाणूमुळे (Varicella-Zoster Virus) होते, त्यावर कोणताही इलाज नाही.

 

चिकनपॉक्स रोखण्यासाठी आता अस्तित्वात असलेली ही लस ९० टक्क्यांपर्यंत प्रभावी मानली जाते. चिकनपॉक्समुळे (Chickenpox) शरीरावर पुरळ किंवा फोड येतात, त्यात खुप खाज सुटणे आणि जळजळ होते. काही दिवसांत या विषाणूंची शक्ती कमकमी होत जाते. हा आजार बरा होतो. म्हणून याला देवीचा रोग म्हणतात.

 

त्यामुळेच अनेकदा कोणतीही औषधे न घेण्याचा सल्ला यावेळी डॉक्टरांकडून दिला जातो. या आजाराचा मुलांना जास्त त्रास होतो. चिकनपॉक्स संसर्गा दरम्यान आणि त्याविरूद्ध काही उपाय बरेच उपयुक्त ठरू शकतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) मजबूत करून या विषाणूजन्य संसर्गाचे संरक्षण केले जाऊ शकते.

 

शरीरावर पुरळ येतात (Acne On The Body) –
रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) तज्ञांच्या मते, चिकनपॉक्स हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. यामुळे संक्रमितांना छाती, पाठ आणि चेहर्‍यावर पुरळ किंवा फोड येतात. जेव्हा संसर्ग वाढतो, तेव्हा पुरळ संपूर्ण शरीरात पसरते. विशेषत: अर्भक, किशोरवयीन मुले, प्रौढ, गर्भवती महिलांना या संसर्गाचा धोका अधिक असतो. तज्ज्ञांच्या मते, ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यांना या संसर्गाचा धोका अधिक असतो. चिकनपॉक्सपासून बचाव करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चिकनपॉक्सची लस (Chickenpox Vaccine) घेणे.

 

लक्षणे एका आठवड्यापर्यंत दिसतात (Symptoms Visible For A Week) –
चिकनपॉक्समुळे शरीरावर पुरळ आणि फोड येतात. या पुरळांना खाज सुटते तर कधीकधी यातून पाणीही येते. पुरळ प्रथम छाती, पाठ आणि चेहर्‍यावर दिसतात आणि नंतर संसर्ग वाढत असताना तोंड, पापण्या किंवा जननेंद्रियासह संपूर्ण शरीरात पसरतात. बरे होण्यास सामान्यत: एक आठवडा लागू शकतो. पुरळांबरोबरच ताप, थकवा, भूक न लागणे आणि डोकेदुखीचा त्रासही होतो.

आजार आपोआप बरा होतो (Disease Heal On Its Own) –
चिकनपॉक्सचा संसर्ग आपोआप बरा होतो. सामान्यत: यामध्ये डॉक्टर घरगुती उपचारांचा वापर करण्याची शिफारस करतात. कॅलामाइन लोशन आणि बेकिंग सोडा, ओटमील बाथ (Calamine Lotion, Baking Soda And Oatmeal Bath) आदींमुळे खाज सुटण्यापासून आराम मिळतो. खाजवण्यामुळे हा आजार इतरत्र पसरतो. म्हणून नखे लहान ठेवा. जरी आपण चुकून फोड फोडला, तरीही साबण आणि पाण्याने आपले हात पूर्णपणे धुवा.

 

चिकनपॉक्सची लस घ्या (Get Chickenpox Vaccine) –
चिकनपॉक्सपासून बचाव करण्यासाठी लस घेणे खूप फायदेशीर मानले जाते.
चिकनपॉक्स लसीचे दोन डोस आपल्याला संसर्गापासून वाचविण्यात मदत करू शकतात.
जरी लस घेतलेल्या व्यक्तीस चिकनपॉक्स झाला तरीही, लक्षणे कमीतकमी किंवा सौम्य असतात.
संसर्गाच्या काळात आहाराची विशेष काळजी घ्या, रोगप्रतिकारशक्ती वाढवणार्‍या गोष्टी जास्त प्रमाणात सेवन करा.
संसर्गाच्या वेळी द्रव पदार्थ, रस आणि पाणी पित रहा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Chickenpox | chickenpox causes and symptoms in marathi tips to prevent chickenpox infection

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS Chief Raj Thackeray | 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, औरंगाबादच्या सभेत ‘राज’गर्जना (व्हिडिओ)

 

Devendra Fadnavis | ‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही’; फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल 

 

Buttermilk | उन्हाळ्यात ताकाचं सेवन खूप फायदेशीर ठरतं, पण ‘या’ लोकांसाठी अडचणी वाढू शकतात; जाणून घ्या