‘मी रंगा-बिल्लासारखा आरोपी आहे का ?’ पी. चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात विचारलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएनएक्स मीडिया प्रकरण आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी गेल्या 99 दिवसांपासून जेलमध्ये असलेले काँग्रेसचे माजी अर्थमंत्री पी चिंदबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन देण्यास नकार दिल्यानंतर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात अनके सवाल उपस्थित केले. मी रंगा-बिल्ला सारखा अपराधी आहे का असं त्यांनी म्हटलं.

रंगा आणि बिल्लाला 1978 मध्ये दिल्लीत दोन बहिण-भाऊ गीता आणि संजय चोपडाच्या अपहरण आणि हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यांना दोघांनाही मत्यूची शिक्षा सुनावण्यात आली होती. 1982 मध्ये दोघांनाही फाशी देण्यात आली होती.

‘माझ्याविरोधात एकही पुरावा नाही’ : चिदंबरम
पी चिदंबरम यांनी बुधवारी कोर्टात सांगितलं की, त्यांना जेलमध्ये केवळ यामुळे ठेवण्यात आलं की, ते आयएनएक्स मीडिया मनी लाँड्रिंग केसचे मुख्य आरोपी कार्ती चिदंबरमचे पिता आहेत आणि या प्रकरणाशी जोडताना त्यांच्याविरोधात एकही पुरावा नाही. दरम्यान दिल्लीतील कोर्टानं त्यांची न्यायालयीन कोठडी दोन आठवड्यांसाठी वाढवली आहे. या प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मी रंगा-बिल्ला नाही’
चिदंबरम यांच्या वतीनं ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती आर भानुमती यांच्या अध्यतेखालील खंडपीठाला म्हटलं की, “असं म्हटलं गेलं आहे (उच्च न्यायालयाच्या निर्णयात) की, जर मला जामीनावर सोडण्यात आलं तर देशात चुकीचा संदेश जाईल. जसं काही मी रंगा-बिल्लासारखा आरोपी आहे. यानंतर ज्येष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनीही युक्तीवाद केला. ते म्हणाले, ईडीनं म्हटलं होतं की, त्यांनी (चिदंबरम) तपास एजन्सीच्या ताब्यात असताना साक्षीदारांना प्रभावित केलं होतं.

हायकोर्टाच्या निर्णयाचा हवाला
सिब्बलांनी चिदंबरम यांना जामीन देण्यास नकार दिल्यासंबंधी दिल्ली उच्च न्यायालयातील 15 नोव्हेंबरच्या निर्णयाचा हवाला दिला आणि म्हणाले, “यात असं म्हटलं होतं की, माजी मंत्र्यांचा ना ही पळून जाण्याचा धोका आहे आणि ना ही ते पुराव्यांसोबत छेडछाड करण्याच्या किंवा साक्षीदारांवर प्रभाव पाडण्याच्या कोणत्याही प्रयत्नात गुंतलेले आहेत. उच्च न्यायालयानं या निष्कर्षावर पोहोचल्यानंतरही चिदंबरम यांची जामीन याचिका हे सांगत फेटाळली की, गुन्हा गंभीर आहे आणि जामीन दिल्यास चुकीचा संदेस जाऊ शकतो.”

Visit : Policenama.com