पी. चिदंबर’मनीं’ लाचखोरीच्या पैशातून खरेदी केलं क्लब आणि बंगला, ED चा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएनएक्स मीडिया कंपनीतील आर्थिक गैरव्यवहार आणि एअरसेल – मॅक्सिस २ जी प्रकरणाबाबत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्याचा मुलगा कार्ती यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्ती चिदंबरम यांनी स्पेनमध्ये टेनिस क्लब, इंग्लंडमध्ये कॉटेज आणि देश-विदेशात एकूण ५४ कोटी रुपये किमतीची मालमत्ता खरेदी केली होती. ईडीने ऑक्टोबर २०१८ मध्ये जाहीर केलेल्या जप्ती आदेशानुसार ही सर्व संपत्ती आयएनएक्स मीडिया प्रकरणाच्या लाचखोरीच्या पैशांतून खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे चिदंबरमही आपल्या मुलासोबत या प्रकरणात सहआरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ईडी आणि सीबीआयने या दोघांविरुद्ध आयएनएक्स मीडिया कंपनीतील आर्थिक गैरव्यवहार आणि एअरसेल-मॅक्सिस २ जी घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरु केली.

दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यांच्या सर्व संपत्ती जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात दिल्लीतील १६ कोटी रुपयांच्या बंगला आणि स्पेनमध्ये खरेदी करण्यात आलेली १५ कोटी रुपयांच्या जमीन आणि टेनिस क्लब, इंडियन ओव्हरसीज बँकेतील ९.२३ कोटी रुपयांची मुदत ठेव, चेन्नईच्या डीसीबी बँकेतील ९० लाख रुपयांची मुदत ठेव आदींचा समावेश आहे.

पीटर मुखर्जीने कार्तीच्या सर्व संस्थांना ३.०९ कोटी रुपये दिल्याचा ईडीने दावा केला आहे. तसेच कार्तीशी संबंधित संस्थांमध्ये आलेले पैसे एएसपीसीएलकडे पोहचल्याचे पुरावे मिळाले असल्याचे ईडीने जप्ती आदेशात म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –