30 तासांपासून ‘बेपत्ता’ असलेल्या पी. चिदंबरम यांना अखेर CBI कडून अटक

नवी दिल्ली : INX मीडिया प्रकरणी कॉग्रेस नेते पी चिदंबरम यांना तब्बल 30 तासानंतर सीबीआयने अटक केली आहे. सक्तवसुली संचलनालयानंतर आता सीबीआयने देखील पी. चिदंबरम यांना लूकआऊट नोटीस बजावली होती. पी चिदंबरम यांना देश सोडून जाण्याच्या भीतीने रोखण्यासाठी सीबीआयने ही लूकआऊट नोटीस बजावली होती, परंतू चिदंबरम 30 तासानंतर काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद देखील साधला. परंतू यानंतर 30 तास बेपत्ता असलेल्या चिदंबरम यांनी सीबीआयकडून अटक करण्यात आली.

पी चिदंबरम यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज म्हणजेच बुधवारी सकाळी सीबीआयची टीम पोहोचली मात्र, चिदंबरम घरात नसल्याने सीबीआयची निराशा झाली होती.

या दरम्यान पी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर शुक्रवारी सुनावणी होणार असल्या कारणाने अटकेची शक्यता वाढली होती. याचिकेची सुनावणी कोणत्या खंडपीठासमोर घ्यायची याचा निर्णय गुरुवारी संध्याकाळपर्यंत घेतला जाणार आहे. त्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

INX मीडिया घोटाळा प्रकरणी पी चिदंबरम यांच्याविरोधात सीबीआयकडून भ्रष्टाचारप्रकरणी आणि ईडीकडून आर्थिक घोटाळा प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होती.