‘CJI’ रंजन गोगाईंच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस, 3 मिनीटांमध्ये 10 खटल्यात नोटीस जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या कार्यकाळाच्या अंतिम दिवशी चीफ जस्टीस (CJI) रंजन गोगोई काही वेळासाठीच आपल्या कार्यालयात बसले होते. परंपरेनुसार CJI रंजन गोगोई आपले उत्तर अधिकारी जस्टिस एस ए बोबडे यांच्यासोबत कोर्ट रूममध्ये बसले. यावेळी त्यांनी केवळ 3 मिनिटांतच 10 खटल्यांसाठी नोटीस बजावली. 17 नोव्हेंबर रोजी चीफ जस्टीस रंजन गोगोई यांच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस आहे जो विकेंडला येत आहे.

यावेळी काही पत्रकारांनी गोगोईंकडे मुलाखतीची मागणी केली. परंतु त्यांनी पत्रकारांशी संवाद साधण्यास नकार दिला. बार असोसिएशनकडून आयोजित फेअरवेल फंक्शनमध्येही ते कोणाला संबोधित करणार नाही.

कसा होता रंजन गोगोईंच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस ?
– कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी CJI रंजन गोगोई केवळ 3 मिनिटे आपल्या कोर्टात बसले.
– परंपरेनुसार, ते आपले उत्तराधिकारी जस्टिस बोबडेंसोबत कोर्ट रूममध्ये बसले.
– जेव्हा रंजन गोगोई साडे दहा वाजता कोर्टरूममध्ये पोहोचले तेव्हा रूम पूर्णपणे भरलेली होती.
– 18 नोव्हेंबर रोजी जस्टिस बोबडे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. त्याआधीच आज(शुक्रवार दि 15 नोव्हेंबर) रंजन गोगोई आणि बोबडे यांच्या खंडपीठाने कामाच्या लिस्टमधील 10 खटल्यांना नोटीस बजावली.
– या सगळ्या प्रक्रियेनंतर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खन्ना यांनी सर्वांतर्फे जस्टिस रंजन गोगोई यांचे आभार मानले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
– यावेळी जस्टीस गोगोई यांनी सर्वांना धन्यवाद दिले. कक्षातील सर्व उपस्थितांना हाथ जोडून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला.
– शुक्रवारी दुपारी अडीच वाजता चीफ जस्टीस गोगोई राजघाट येथे गेले आणि त्यांनी महात्मा गांधींना श्रद्धांजली दिली. जेव्हा त्यांनी CJI म्हणून पदभार सांभाळला तेव्हाही ते राजघाटला आले होते.
– आज संध्याकाळी (शुक्रवार दि 15 नोव्हेंबर) चीफ जस्टीस रंजन गोगोई देशातील सर्व उच्च न्यायालयातील 650 न्यायाधीश आणि 15000 हून अधिक न्यायिक अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे संबोधित करणार आहेत.

आपल्या कार्यकाळातील शेवटच्या दिवसांत चीफ जस्टीस रंजन गोगोईंनी अनेक मोठ्या खटल्यांमध्ये निर्णय सुनावला आहे. यात अयोध्या केस, कर्नाटक आमदार केस, शबरीमाला केस, राफेल विमान पुनर्विचार याचिका, राहुल गांधींवरील अवमानना केस अशा अनेक खटल्यांचा समावेश आहे. चीफ जस्टीस रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं शबरीमाला वाद 7 न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवला आहे.

Visit : Policenama.com