CJI रंजन गोगोई यांनी वडिलांच्या सांगण्यावरून दिली होती ‘UPSC’, नंतर मात्र स्वतःचच ऐकलं

नवी दिल्ली : वृत्तसंथा – सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा सर्वोच्च न्यायालयातील आज शेवटचा दिवस, 13 महिन्यांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी एकूण 47 निर्णय दिले. ज्यामध्ये काही ऐतिहासिक निर्णयांचा देखील समावेश आहे. त्यांच्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी शरद अरविंद बोबडे हे सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. रंजन गोगोई यांच्या शिक्षणाबद्दल आपण काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत.

रंजन गोगोई हे मुळचे आसामचे. या आधी त्यांनी पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिलेले होते. सरन्यायाधीश होण्याआधी सर्वोच्च न्यायालयात ते वरिष्ठ न्यायाधीश होते. 18 नोव्हेंबर 1954 रोजी जन्मलेल्या गोगोई यांनी 1978 मध्ये वकिली सुरु केली होती. त्यानंतर 28 फेब्रुवारी 2001 ला गुवाहाटी हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत झाले. यानंतर नऊ वर्षानंतर 9 सप्टेंबर 2010 रोजी पंजाब आणि हरियाणाच्या हायकोर्टात त्यांची बदली करण्यात आली. त्याचे पिता केसब गोगोई हे काँग्रेसचे एक नेता होते. 1982 मध्ये त्यांनी दोन महिन्यांसाठी आसामचे मुख्यमंत्री म्हणून देखील काम केले होते.

दिल्लीला शिक्षणासाठी जाण्याआधी रंजन गोगोई यांनी आसामच्या डॉन बॉस्कोमध्ये आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या स्टीफन कॉलेजातुन लॉची डिग्री पूर्ण केली.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार रंजन गोगोई यांची खाजगी संपत्ती देखील खूप कमी आहे. त्यांच्याकडे स्वतःचे घर देखील नाही. तसेच गोगोई यांच्याकडे कौटुंबिक कोणतीही ज्वेलरी नाही. जी आहे ती पत्नीने लग्नात आणलेली ज्वेलरी आहे. 18 नोव्हेंबर रोजी गोगोई हे निवृत्त होणार आहेत आणि याच दिवशी त्यांचा जन्म दिवस देखील आहे. अ‍ॅडव्होकेट उपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की यावर्षी ते पहिल्यांदा आपला जन्म दिवस साजरा करणार आहेत.

रंजन गोगोई यांनी युपीएससीची परीक्षा देखील उत्तीर्ण केलेली आहे. मात्र या नंतर त्यांनी वडिलांना आपल्याला कायद्याचा अभ्यास करायचा असल्याचे सांगितले आणि आपल्याला वकील व्हायचे असल्याचे स्पष्ट केले असे सर्वोच्च न्यायालयाचे बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी एका कार्यक्रमादरम्यान गोगोई यांच्याबद्दल सांगितले होते.

Visit : Policenama.com