मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा

बंगळरुः वृत्तसंस्था

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजिनामा दिला आहे. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सुप्रिम कोर्टाने शनिवारी 4 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र बहुमताचा आकडा न गाठता आल्यामुळे बीएस येडियुरप्पा यांना शेवटीआपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला आहे.

भाजपने बहुमत सिद्ध करण्यासाठी मोठे-मोठे दावे केले असले तरी, प्रत्यक्षात मात्र बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपची चांगलीच दमछाक झालेली बघायला मिळाली आहे. सुरूवातीपासूनच कर्नाटकच्या राजकिय आखाड्यात एकमेकांच्या विरोधातली बाजी पलटताना दिसत होती. सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी भाजपला निमंत्रण दिल्यानंतर येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल २०१८ 
 
भाजप १०४
काँग्रेस ७८
जनता दल (सेक्युलर) ३७
बहुजन समाज पार्टी १
कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी १
अपक्ष १

संबंधित घडामोडी:

कर्नाटकात काँग्रेस,जेडीयुची खरी परिक्षा
येडियुरप्पा घेणार उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ
बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
कर्नाटकात उद्याच बहुमत चाचणी घ्या : सुप्रीम कोर्ट
कर्नाटक : बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडे २८ तास
राजीनामा तरीही, येडियुरप्पांची ‘रेकॉर्ड’ ब्रेक कामगिरी
येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाले शरद पवार
सोशल मीडियावर येडियुरप्पा आणि भाजपच्या जोक्सचा धुमाकूळ
कुमारस्वामी होणार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान