‘शेकाप’चा झाला ‘भाकाप’, सोबतीला काँग्रेस, अशी ही महाखिचडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला

पेण : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची अनाचारी, दुराचारी, अत्याचारी, भष्टाचारी अशी कारकिर्द आपण पाहिली. पण, आता तो जमाना गेला. या मतदारसंघात शेकापने सुद्धा त्यांना पाठिंबा दिला. शेकाप हा एकेकाळी शेतकरी आणि कामगारांचा पक्ष होता. पण, आता तो ‘भाकाप’ झाला. भांडवलदार आणि कारखानदारी करणाऱ्यांचा पक्ष झाला आहे. सोबतीला काँग्रेस पक्षही आहे. अशी महाखिचडी असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी शेकापसह काँग्रेस-राष्ट्रवादीला लागावला. ते रायगड लोकसभा मतदार संघातील पेण येथे बोलत होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ पैशासाठी महाराष्ट्रावर राज्य केले आणि सत्तेतून पैसा अन् पैशातून सत्ता असे एक दृष्टचक्र निर्माण केले. सामान्य माणसांच्या गरजांकडे या पक्षांनी पूर्ण दुर्लक्ष केले आणि अगदी मूलभूत गरजांपासूनही त्यांना वंचित ठेवले असा आरोप त्यांनी केला.

मागील पाच वर्षात एक नवी कार्यसंस्कृती आम्ही रूजविली आणि गतिमान विकासाचा मार्ग पत्करला. पाणी पुरवठ्याच्या योजना असो की मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प सर्वांना गती दिली. रस्ते, रेल्वे, बंदरविकास, जलवाहतूक अशी मोठी कामे आता होत आहेत. मासेमार बांधवांसाठी देखील अनेक कल्याणकारी योजना आणि उपाय हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Loading...
You might also like