मोदींना घाम फोडणारा अजून पैदा व्हायचाय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वसई : पोलीसनामा आॅनलाईन

पालघर लोकसभा पोटनिडणूकीचे चांगलेच शब्दयुद्ध सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप उद्धव ठाकरे यांनी भर सभेत जाहीर केली. त्यानंतर पेटून उठलेल्या फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर चांगलीच तोफ डागली.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे म्हणतात, पोलीस बाजूला करा मग बघा. पण मी सांगू इच्छितो, मी मुख्यमंत्री होईपर्यंत गार्डही घेतला नाही. आताची सुरक्षा आहे ती मुख्यमंत्र्यांना आहे, देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला नाही’.

पंतप्रधान मोदींविषयी बोलताना मख्यमंत्री म्हणाले, मोदींवर वारंवार टीका करता, मोदींना कर्नाटक निवडणुका सांभाळताना घाम फुटला अशी वक्तव्ये करता. पण मी सांगतो,”मोदींना घाम फोडणारा अजून पैदा व्हायचाय. मोदी त्सुनामी आहेत. त्याग काय असतो हे तुम्हाला माहीत नाही. असा टोला फडणवीस यांनी लगावला.

शिवसेनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही गोष्टीला विरोध करणे हे शिवसेनेचे कामच आहे. शिवसेना ही पूर्वी शिवसेना होती आता ती ‘शिवविरोध’सेना आहे .शिवसेनेला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच जमतो. ऑडिओ क्लिप संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी जी क्लिप दाखवली ती मोडून तोडून दाखवण्यात आली आहे. मी निवडणूक आयोगाकडे स्वतःही ऑडिओ क्लिप देतो यात काही आक्षेपार्ह असेल तर माझ्यावर कारवाई करण्यात यावी. ऑडिओ क्लिपबाबत वाचून दाखवणारा सिद्धिविनायक ट्रस्टचा अध्यक्ष आहे, त्याने तरी भान ठेवायचं. पण तो आदेशाने काम करणारा आदेश बांदेकर आहे. असेही फडणवीस म्हणाले.

 

संबंधित घडामोडी:

उद्धव ठाकरेंनी भरसभेत केली जाहीर मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप