परिक्षेत फेल झाल तर ‘पेन’ जबाबदार नसतो, EVM वरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सुरु असलेली भाजपची महाजानदेश यात्रा भुसावळ मध्ये पोहचली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाजनादेश यात्रेने ५० विधानसभा मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच उत्तर महाराष्ट्रात यात्रेला मोठ्या प्रमाणावर लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

नेमकं काय म्हणालेत मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत –
उत्तर महाराष्ट्रात यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
तापी प्रकल्पासाठी सहा हजार कोटींची मान्यता
जळगावात २ लाख लाभार्थ्यांना ७८६ कोटींची कर्जमाफी

गेल्या पाच वर्षांमध्ये विरोधकांना सुरच सापडलेला नाही, लोकसभेवेळी मोदींना शिव्या देणं एवढंच काम विरोधकांना होत आणि हा अजेंडा फेल झाल्यानंतर आता ईव्हीएमचा अजेंडा सुरु केलाय. मात्र विरोधकांना हे माहित नाही की, आपण परीक्षेत फेल झालो तर त्याला पेन जबाबदार नसतो. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ईव्हीएम बाबत विरोधकांना उत्तर दिल आहे.

आरोग्यविषयक वृत्त –