मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संजय काकडेंना शाब्बासकी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार संजय काकडे यांनी भाजपामध्ये केलेलं ‘इनकमिंग’ भाजपाच्या शिवाजीनगर, कोथरुड आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील विजयामध्ये अतिशय महत्वपूर्ण ठरले. या तीनही मतदार संघातील भाजपाच्या उमेदवारांचा त्यामुळे विजय सोपा झाल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले. खासदार काकडेंच्या या महत्वपूर्ण कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांना शाब्बासकी दिली.

विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल खासदार संजय काकडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबईमध्ये भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल खासदार काकडे यांनी दोघांचेही पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्ह्यातील निकालाबाबत त्यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या उमेदवारांचे घटलेले मताधिक्य, चार आमदारांचा झालेला पराभव आणि पुढील काळात करावयाची कामे यासंदर्भात ही चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार काकडे यांनाच शाब्बासकी देत त्यांनी पुण्यातील तीन मतदार संघात केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर खासदार संजय काकडे यांनी अतिशय महत्वाच्या क्षणी कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात इतर पक्षातील स्थानिक तगड्या नेत्यांचे इनकमिंग घडवून आणले. त्यांचा भाजपातील पक्ष प्रवेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच उपस्थित घडवून आणला.

पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, माजी नगरसेवक तुकाराम जाधव, माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांचे सुपूत्र आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, लहु बालवडकर, समाधान शिंदे, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत व दुर्योधन भापकर यांचा समावेश होता. यामुळे कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील भाजपची ताकद वाढली. आणि यामुळे या मतदार संघातील भाजपाच्या उमेदवारांचा विजय सोपा झाल्याची चर्चा सर्वदूर होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणुकीतही खासदार संजय काकडे यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपविली होती. त्यावेळी खासदार संजय काकडे यांनी ताकदीचे स्थानिक नेते भाजपची ताकद नसलेल्या ठिकाणी आणले आणि दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले आणि त्याचीच पुनरावृत्ती या विधानसभा निवडणुकीत कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात पाहायला मिळाली. यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासतला माणूस आणि जबाबदारी टाकली की ती फत्ते करणारा माणूस म्हणून खासदार काकडेंची ओळख निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा