३१ आॅक्टोबरपर्यंत दुष्काळाची घोषणा करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव : पोलीसनामा आॅनलाईन

यावर्षी राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी प्रमाणात झाला असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून शासकीय यंत्रणेला उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश देण्यात येत आहेत. याबाबत महसूल व कृषी विभागाकडून सरकारला अहवाल प्राप्त होत आहेत. येत्या ३१ आॅक्टोंबरपर्यंत दुष्काळाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ebeb240f-cafe-11e8-8e27-4fe3d1288118′][amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ee5f7f62-cafe-11e8-95bb-a73b3ef6b598′]

जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा, महत्त्वाचे प्रकल्प, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार आनंद सोहळा व छत्रपती संभाजीराजे बंदिस्त नाट्यगृहाचे लोकार्पण या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौर्‍यावर आहेत. आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, खासदार ए. टी. पाटील, आमदार स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, संजय सावकारे, शिरीष चौधरी, सुरेश भोळे, उन्मेश पाटील, चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.

[amazon_link asins=’B01I59VBLO,B077S3Y5MQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’07b4a2f9-caff-11e8-b025-41d5e48a7fc2′]

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, यावर्षी राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या केवळ ६७ टक्के पाऊस झाला असून मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ५ टक्क्यांनी कमी आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख प्रकल्पांमध्ये अत्यल्प तर मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. ही चिंतेची बाब असून यासाठी आतापासूनच उपाययोजना करावी लागणार आहे. काय उपाययोजना करव्या लागतील याबाबत आढावा बैठकीत संबंधीत विभागांना निर्देश देण्यात आले. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळाची घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असेही ते म्हणाले. शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यभरात धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा आढावा –
ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या ४८ योजना मार्च २०१९ अखरे पूर्ण कराव्यात. ज्या योजनांमध्ये जास्त गावांचा समावेश आहे अशा पाणी पुरवठा योजनांसाठी सौर ऊर्जेच्या वापराचा विचार करण्यात यावा. त्यामुळे खर्च कमी होऊन शाश्वत वीज मिळू शकेल. योजनांची माहिती घेऊन योग्य नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने आपल्या विविध योजनांचा सविस्तर डॅशबोर्ड तयार करण्यात यावा. धरणगाव पाणीपुरवठा योजना आणि अमृत योजनेअंतर्गत भुसावळ पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण करण्यासाठी कालमयार्दा ठरविण्यात यावी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि एरंडोलच्या योजना सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

पीक परिस्थितीचा आढावा-
पीक परिस्थीतीचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पीकांची पाहणी करावी आणि वस्तुस्थितीची सातबाऱ्यावर नोंद घ्यावी. हा उपक्रम मिशन म्हणून राबवावा. सूक्ष्म सिंचन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका कृषी अधिका-यांनी लक्ष द्यावे. कर्जावरील व्याजाची हमी शासनाने घेऊनही लाभार्थ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिका-यांना दिले.

[amazon_link asins=’B019XSHB7O,B06Y5HF9GV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3a77a25b-caff-11e8-987f-bbc0c93b4729′]