मदतीला धावलेल्या ‘त्या’ रणरागिणीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील कालवा फुटल्यानंतर पुण्यातील कालव्याजवळच्या वस्त्यांमध्ये महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. ज्या पाण्यात नीट उभेही राहता येत नव्हते अशा वेळेला स्वतःच्या जीवाची फिकीर न करता स्वत: पाण्यात उतरून लहान मुले आणि इतर नागरीकांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या दत्तवाडी पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी रणरागिणी नीलम गायकवाड आणि पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल संतोष लक्ष्मण सूर्यवंशी यांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन करण्यात आला.

या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट,राज्य मंत्री दिलीप कांबळे,पुण्याचे पोलीस आयुक्त श्री,वेंकेटेशम,महापौर सौ,मुक्ता टिळक,खासदार अनिल शिरोळे,पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडके, पोलिस उपायुक्त अशोक मोराळे, शेषराव सूर्यवंशी,हे उपस्थित होते. यावेळी महिला कर्मचारी नीलम गायकवाड आणि इतर पोलिसांचा देखील गौरव करण्यात आला. मुख्यमंत्र्यानी देखील या धाडसी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गौरव नक्कीच इतरांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a907016-c615-11e8-aca8-6d2f4dab5a6a’]

एका रणरागिणीच्या धाडसाचे कौतुक …त्या दिवशी नेमके काय घडले होते.

दिनांक २७ सप्टेंबरच्या सकाळी साडे दहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील मुठा कालवा दांडेकर पुलाजवळ फुटला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लाखो लीटर पाणी रस्त्यावर आले. काही मिनिटातच सिंहगड रस्ता गुडघाभर पाण्याने भरुन गेला. सिंहगड रस्त्याच्या बाजूला असलेल्या जनता वसाहतीत कालव्याचे पाणी शिरले. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. लाखो लीटर पाणी प्रचंड वेगाने झोपड्यांमध्ये घुसले त्यामुळे अनेकांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले होते.

अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेक वृद्ध, लहान मुले अडकून पडले. त्यावेळी धावून आले पुणे पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी लहान मुलांना आपल्या पाठीवर बसवून गुडघाभर पाण्यातून वाट काढत सुरक्षितस्थळी हलवले. तसेच कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला. खडकवासला कालव्याला गुरूवारी २७ सप्टेंबरला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दांडेकर पूलाजवळ भगदाड पडले. त्यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. या ठिकाणच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घरामध्ये अडकलेल्या लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर काढून सुरक्षितस्थळी नेण्यात आले. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी सगळेच झटत होते. महिला पोलिसांनी तर लहान मुलांना आपल्या पाठिवर बसवून दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. अनेक ज्येष्ठ महिलांनाही आधार देत बाहेर काढण्यात आले.

[amazon_link asins=’B017WDVV3M,B01HQ4NZE0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c83a59a8-c615-11e8-a24d-53c2089476cc’]

महिला पोलीस तात्काळ मदतीला धावून आल्याने लहान मुलांच्या पालकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, लांबच लांब लागलेल्या रांगा कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनीही मोठी कसरत केल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या

मुळा कालवा फुटला, दांडेकर पुल पाण्याखाली