मुख्यमंत्र्यानी माझ्या वडिलांची जागा भरून काढली : सुजय विखे-पाटील 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुजय विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सुजय विखेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईतील वानखडे स्टेडियम मधील एमसीए पॅव्हेलियन येथे सुजय विखेंच्या भाजपप्रवेशासाठी भाजपसह विखेंच्या कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली गेली होती. यावेळी सुजय विखे पाटील यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित नव्हते. पण ‘मुख्यमंत्र्यानी माझ्या वडिलांची जागा भरून काढली’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. गेल्या १ महिन्यापासून अनेक तर्क वितर्क या प्रवेशाबाबत चालू होते. पण भाजपातल्या नेत्यांनी मला भाजपात प्रवेश दिला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला एवढ्या मोठ्या पदावरच्या माणसाने आदर दिला, वडिलांसारखा आधार दिला त्याबाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. आज मी वडिलांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला आहे. आज माझी आई माझ्या निर्णयासोबत आहे की नाही हे मला माहित नाही पण मी डॉ. सुजय विखे-पाटील भाजपात जाण्याचा माझा वैयक्तिक भूमिका आहे. आणि मी इथून पुढे भाजपशी कर्तव्य निष्ठ राहीन” असे विखे पाटील म्हणाले.

दोन्ही खासदार भाजपचेच
यावेळी बोलताना दोन्ही खासदार भाजपचे असा विश्वास सुजय यांनी व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यात पक्षाच्या वाढीसाठी काम करणार. तसेच भाजपच्या नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबाबत मी त्यांचा आभारी आहे. असे सुजय विखे-पाटील यांनी सांगितले.

या प्रवेश सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: उपस्थित होते. अहमदनगराच्या काही निवडक कार्यकर्त्यांना आज रात्री मुंबईत येण्याचे आदेश आधीच देण्यात आले होते. त्यामुळे विखेंकडून मुंबईत मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनुश्री यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी जलसम्पदा मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रवक्ते रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांदादा पाटील यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.

ह्याही बातम्या वाचा –

लोकसभेच्या उमेदवारीसाठी अखेर सुजय विखे-पाटील यांचा भाजपात प्रवेश

मग पाच वर्षे झोपा काढल्या का, जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

लोकसभेच्या उमेदवारीसाठी अखेर सुजय विखे-पाटील यांचा भाजपात प्रवेश

विखेंचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल

सुजय विखेबरोबर काँग्रेसचे नेते जाणार भाजपमध्ये ?

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like