CM हेमंत सोरोन यांच्यावर बलात्काराचा आरोप, महिला आयोगाने घेतली दखल

रांची : वृत्तसंस्था – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (CM Hemant Soren) यांच्यावर मुंबईतील (Mumbai) एका मॉडेलने बलात्काराचा आरोप केला आहे. यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी सोरेन यांच्या टीकांचा भडिमार सुरु केला आहे. हेमंत सोरेन यांना घेरण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या भाजप (BJP( नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात ट्विट करण्यात येत आहे. त्यातून ट्विटरवर #RapeAccusedCM नावाने हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. दरम्यान, या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली आहे.

हरयाणाचे भाजपचे नेते अरुण यादव यांनी ट्विट करुन काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला आहे. त्यांनी काँग्रेसवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेस अल्पसंख्यांकांच्या हिताचा विचार करणार असल्याचं निवडणुकीच्यावेळी सांगण्यात आले. मग, आता ज्या सरकारचे मुख्यमंत्रीच बलात्काराचे आरोप आहेत, तेव्हा काय करणार ?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच ट्विटरवरुन कार्यकर्त्यांना हेमंत सोरेन यांच्याविरुद्ध जास्तीत जास्त ट्विट आणि रिट्विट करण्याचं आवाहनही केलंय. हा ट्रेड ट्विटरवर राहू देण्याचे देखील सूचवलं आहे.

भाजपचे दुसरे नेते विकास प्रितम सिंह यांनी ट्विटरवर हेमंत सोरेन यांना लक्ष्य केलं आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी इतिहास रचला आहे. त्यामुळे कुणी त्यांच्याजवळ जाऊ इच्छित नाही. बलात्कार प्रकरणात आरोपी असतानाही ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

महिला आयोगाने घेतली दखल
याप्रकरणातीली पीडित अभिनेत्रीची चिठ्ठी व्हायरल झाली आहे. यामध्ये गेल्या सात वर्षापासून होत असलेल्या अन्यायाची माहिती देण्यात आली आहे. तसेच पोलिसांनीही तक्रार घेतली नसल्याचे तिने चिठ्ठित म्हटले आहे. आता या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी लक्ष घातले असून मुंबईच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून चौकशी संदर्भात सुचवले आहे.

काय आहे प्रकरण ?
काही दिवसांपूर्वी महिला आयोगाने 2013 साली मुंबईतील एका मॉडेल अभिनेत्रीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी सुरु केली. एनसीडब्लूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना चिठ्ठि लिहिली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि सुरेश नागरे यांच्यावर मॉडेलवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका अहवालानुसार, 2013 मध्ये हेमंत सोरेन आणि सुरेश नगारे यांनी मुंबईतील एका मॉडेलवर बलात्कार केला होता. तसेच याची कुठे वाच्चता न करण्याची धमकीही दिली होती.