शब्द न पाळणार्‍यांशी संघर्ष केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शब्द पाळतील : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जालन्यात ऊस संस्था उभारण्याचा दिलेला शब्द तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळला नाही. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा शब्द पाळतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या 43 व्या सर्वसाधरण सभेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, मागील वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जालना येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटसाठी जागा दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनांची त्यांनी पूर्तता केली नाही. जे मुख्यमंत्री आश्वासनांचा शब्द पाळत नाहीत अशांसोबत संघर्ष करण्याचे काम या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे हे मुख्यमंत्री आपला शब्द पाळती. आपलं सरकार आता जालना येथे निश्चितपणे ऊस संस्था उभारेल.

आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. कारण यापूर्वी शेतात आपण साखर उत्पादनात क्रमांक एकवर होतो. आता उत्तरप्रदेश एक नंबरवर आहे. आपण दुसऱ्या क्रमांकावर आलो आहोत, असे होता कामा नये. या स्पर्धेत जर कोणी आपल्या पुढे जात असेल तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण दर एकरी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/