राधाकृष्ण विखे पाटलांचं CM ठाकरेंना आवाहन, म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ विधान तात्काळ मागे घ्यावं’

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाई – उद्धव ठाकरेंनी आपलं विधान मागे घ्यावं असं म्हणत भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधान मागे घेण्यासाठी आवाहन केलं आहे. साई जन्मस्थळाच्या मुद्द्याची दाहकता वाढताना दिसत आहे. रविवारपासून शिर्डीत बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. पंचक्रोशीतील अनेक गावं यात सहभागी होताना दिसत आहेत. अशात साई जन्मस्थळाच्या वादाच्या मुद्द्यावर विखे पाटलांनी भाष्य केलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलत असताना मुख्यमंत्र्यांना आवाहन करताना विखे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली आहे. शिर्डीच्या जन्मस्थळाच्या वादावर अर्थकारण जोडलंय हे केलेले आरोप योग्य नाहीत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपलं विधान मागे घ्यावं” असं म्हणत त्यांनी साई जन्मस्थळाच्या वादावर भाष्य केलं.

मराठवाड्यातील साई बाबांच्या जन्मस्थळासाठी 100 कोटींचा विकास आराखडा राबवला जाईल अशी घोषणा मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती. याचे तीव्र पडसाद शिर्डीत उमटताना दिसत आहेत. पाथरीला निधी देण्यात शिर्डीकरांचा आक्षेप नाही, परंतु साई जन्मस्थान म्हणून त्याची ओळख निर्माण केली जाते, यावर त्यांचा आक्षेप आहे. जन्मस्थळांच्या वादामुळं बाबांच्या मूळ शिकवणीला धक्का पोहोचणार असल्यानं शिर्डीकरांचा जन्मस्थानाच्या दाव्याला आक्षेप आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like