CM उद्धव ठाकरे 3 दिवसांची सुट्टी घेऊन जाणार महाबळेश्वरच्या खासगी दौऱ्यावर

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील विधानसेभपासून तर सत्ता स्थापन होईपर्यंत राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. सर्वच पक्षातील नेत्यांची बरीच धावपळ पहायला मिळाली. कोणालीही निवांत असा वेळ मिळाला नसावा. उद्धव ठाकरे हेही मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचीही शासकीय धावपळ झाली. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन दिवस सुट्टी घेत महाबळेश्वरला जाणार आहेत.

महाबळेश्वरच्या खासगी दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे राजभवन आणि शासकीय निवासस्थानी मुक्कामी असतील. वेण्णालेक पठारावर त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार अशी माहिती आहे. प्रशासनानंही तशी तयारी केली आहे. खास बात अशी की आमदार भास्कर जाधव यांच्या मुलीचा विवाह महाबळेश्वर येथील कीज रिसॉर्टमध्ये 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या विवाह सोहळ्यास ते उपस्थित असणार आहेत. सुरक्षेचा विचार करता विविध विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी आणि 100 हून अधिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आहेत.

वेण्णालेक येथील पठारासह महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर असलेल्या वेलोसिटीमधीलही जागेची पहाणी करण्यात आली आहे. अखेर वेण्णालेक पठारावर हेलिकॉप्टर उतरवण्याची तयारी झाली आहे असं प्रश्नासनानं सांगितलं आहे. मुख्यमंत्री ज्या हेलिकॉप्टरनं येणार आहेत ते 6 आसनी असल्यानं त्याचे पंख मोठे आहेत. त्यामुळे त्याच्या लँडिंगसाठी जागा शोधण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.