‘पाऊस भरपूर पडणार म्हटलं की, ऊन… असा वेधशाळेचा अंदाज होता, मात्र आता…’

पोलिसनामा ऑनलाईन – पुर्वी वेधशाळेकडून पाऊस भरपूर पडणार म्हटले की, ऊन पडणार आणि उद्या ऊन पडणार असे म्हणतात त्यावेळी छत्री घेऊन हमखास बाहेर पडायचे, असा अंदाज होता. पण आता खूप सुधारणा झाली असून अंदाज बरोबर येत आहेत. मात्र पाऊसच हुलकावणी देत आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो कोविड सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन काल त्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, शहरातील कोविड सेंटर उभारत असताना पाऊस पडत होता. दरम्यानच्या काळात पाऊस तर आहेच, आपल्याकडे उद्या भरपूर पाऊस पडणार असे म्हणतात तेव्हा, धरून चालायचे की ऊन पडणारआणि उद्या ऊन पडणार असे म्हणतात त्यावेळी छत्री घेऊन हमखास बाहेर पडायचे. असा आत्तापर्यंतचा वेधशाळेचा अंदाज होता. पण त्याच्यातही आपण खूप सुधारणा केली आहे. वेधशाळेचे अंदाज खूप बरोबर येत आहेत. मात्र, आता वेधशाळेच अंदाजबरोबर यायला लागल्यानंतर पाऊस हुलकावणी देऊ लागला असल्याचे त्यांनी सांगितले.