मुख्यमंत्र्यांकडून शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा, जाणून घ्या सविस्तर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (शनिवार) विधिमंडळात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्यात आले आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची ही मोठी घोषणा मानली जात आहे. 2 लाखापर्यंतच कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सात बारा कोर्‍याचं काय म्हणून पुन्हा प्रश्न विचारला. मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर फडणवीस यांनी त्याचा निषेध नोंदवला आणि त्यांनी सभात्याग केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील सर्व कानाकोपर्‍यातील शेतकर्‍यांच्या पीककर्ज माफीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/