मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौर्‍यावर ! निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढल्यानंतर मुंबईत तळ ठोकून बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज प्रथमच मुंबईबाहेर अलिबागचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौर्‍यात चक्रीवादळात नुकसान झालेल्यांसाठी ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा बसला. अलिबाग आणि परिसरातील गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. मुख्यमंत्री सकाळी ११ वाजता रोरो पॅसेंजर फेरी सेवेतून रायगडला जाण्यासाठी निघणार आहेत. त्यानंतर ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या गावांना रस्ते मार्गाने जाऊन भेट देतील.

त्यांच्याबरोबर वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे हे ही असणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असा असेल दौरा
दुपारी १२़३० वाजता मांडवा जेट्टी येथे आगमन व तेथून अलिबागला रवाना
दुपारी १२़५० वाजता थळ येथे पोहोचणाऱ चक्रीवादळाने नुकसानीची पाहणी करणार
दुपारी १़२० वाजता थळ येथून अलिबाग येथे रवाना
दुपारी १़३० ला अलिबाग येथील चुंबकीय वेधशाळेच्या नुकसानीची पाहणी
दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीचा आढावा.