मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री जनतेला संबोधित करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री ठीक साडे आठ वाजता समाजमाध्यमांवरून जनतेला संबोधित करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय तसेच कोरोना व्हायरसच्या संकटाबाबत मुख्यमंत्री जनतेला संबोधित करतील अशी माहिती समोर येत आहेत. आज सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय देत आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.

राज्यावरील कोरोनाचं संकट आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल यासंदर्भात मुख्यमंत्री जनतेला संबोधित करतील. दरम्यान, आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एक निवेदन देखील जारी केलेलं आहे. आज (बुधवार) रात्री साडे आठ वाजता उध्दव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करतील.

मुख्यमंत्री जनतेला संबोधित करताना आरक्षणाबाबत आणि कोरोना संकटाबाबत काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सद्यस्थितीत आरक्षणाबाबत मोठी घोषणा देखील करू शकतात.