मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुंबईत होणार्‍या गर्दीवर नाराज, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील Mumbai गर्दीवर नाराजी व्यक्त केली. मी काल लॉकडाऊन उठवत असल्याच तर काही चुकून बोललो नाही ना असे मी अधिका-यांना विचारले. मुंबईतील रस्त्यावर बरीच गर्दी दिसली हे योग्य नाही. मुंबईत Mumbai जर अशीच गर्दी कायम राहिली तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला आहे.

Coronavirus in Pune : मोठा दिलासा ! पुण्यात दुसर्‍या लाटेतील सर्वात ‘निच्चांकी’ रूग्णसंख्या

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 च्या चाचणीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 31) उदघाटन झाले. कांदीवलीजवळ मेट्रो चाचणीचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री वांद्रे येथील एमएमआरडीएच्या सभागृहाकडे यायला निघाले. त्यावेळी रस्त्यावरील ट्राफिकवर त्यांनी बोट ठेवले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या भाषणात यावर भाष्य केले आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील रस्त्यावर होणाऱ्या गर्दीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल जनतेशी संवाद साधला. सविस्तर माहिती जनतेला दिली आणि आज सकाळी सार काही उघडल्यासारखं लोक गर्दी करताना दिसले. कार्यक्रमाला येताना आम्हालाच ट्राफीक लागल. हे चालणार नाही. निर्बंधांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी