आता मुख्यमंत्रीही घराबाहेर पडणार, पूरग्रस्त भागाचा दौरा करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आसमानी संकटामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. त्यामुळे परतीच्या पावसामुळे झालेल्या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना भेटण्यासाठी येत्या सोमवारी (दि.19) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील काही नेते शेतकऱ्यांच्या बांधावर असताना मुख्यमंत्र्यांना घर सुटेना, अशी खोचक टीका भाजपकडून होत आहे. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृतीतून उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री पूरग्रस्तभागाचा दौरा करणार असून नुकसानीची पाहणी झाल्यावर ते पुरग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

असा असणार मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्तं भागांचा दौरा
दिनांक 19 ऑक्टोबर 2020

सकाळी 8 वाजता – सांताक्रुझ विमानतळ येथून सोलापूरकडे प्रयाण
सकाळी 9 वाजता – सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण
सकाळी 9.15 वाजता – शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव
सकाळी 9.30 वाजता – सोलापूर येथून मोटारने अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खूर्दकडे प्रयाण
सकाळी 10.45 वाजता – सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा
सकाळी 11 वाजता – सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी
सकाळी 11.15 वाजता – अक्कलकोट शहराकडे प्रयाण
सकाळी 11.30 वाजता – अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी
सकाळी 11.45 वाजता – अक्कलकोट येथून रामपूरकडे प्रयाण
दुपारी 12 वाजता – रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेती पीकांच्या नुकसानीची पाहणी
दुपारी 12.15 वाजता – रामपूर येथून बोरी उमरगे कडे प्रयाण
दुपारी 12.30 वाजता – रामपूर येथून अक्कलकोटकडे प्रयाण
दुपारी 12.45 वाजता – बोरी उमरगे येथून सोलापूरकडे प्रयाण
दुपारी 3.00 वाजता – पूरपरिस्थीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, नंतर सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण