मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आज (गुरुवार) आग लागली. BCG लस बनवण्याच्या इमारतीला ही आग लागली. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी ही लगली. या दुर्घटनेत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (शुक्रवार) दुपारी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे. यावेळी ते प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.

दरम्यान, पुणे येथील सीरम इन्स्टि्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीत आग लागल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महापालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. राज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश देण्यात आले. ही आग आटोक्यात असून आग्निशमन दलाच्या जवानांनी फार मोलाचे काम केलेलं आहे. जिथे जिथे आग लागते, तिथे हे जवानि स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जातात. जीवितहानी होणार नाही याची काळजी घेतात, मालमत्तेचे रक्षण करतात, किंबहुना आतमध्ये जे अडकलेले असतात त्यांना ते वाचवतात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आगीत 5 जणांचा मृत्यू

सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी भागातील नवीन प्लांटला ही आग लागली. या आगीमध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये पुण्यातील दोन, उत्तर प्रदेशातील दोन आणि बिहार येथील एकाचा मृत्यू झाला. प्रतिक पाष्टे (डेक्कन पुणे), महेंद्र इंगळे (पुणे), रमाशंकर हरिजन (उत्तर प्रदेश), बिपीन सरोज (उत्तर प्रदेश), सुशीलकुमार पांडे (बिहार) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.