मुख्यमंत्र्यांकडून 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना ‘दिलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकासआघाडीकडून शेतकऱ्यांना मोठी गोड बातमी देण्यात आली. ठाकरे सरकारकडून 2 लाखापर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याची घोषणा केली होती. परंतु ही कर्जमाफी वादग्रस्त ठरली. कर्जमाफीच्या जीआरमध्ये 5 वा मुद्दा होता की शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. परंतु या वादावर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यानंतर कर्जमाफीवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले की 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठी वेगळी योजना आणण्यात येईल. तसेच नियमित कर्जाची परत फेड करणाऱ्यांसाठी नवी कर्जमाफीची योजना आणण्यात येईल.

का झाला वाद ?
राज्य सरकारने महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली. परंतु त्यानंतर जीआरमधील पाचवा मुद्दा वादाचा ठरला. त्यानंतर कर्जमाफीच्या जीआरसंबंधित काँग्रेस नेते राजीव सातव यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. राजीव सातव यांनी सांगितले होते की जीआरच्या पाचव्या मुद्दात छेडाछेड करण्यात आली आहे. कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला तेव्हा तो स्पष्ट होता. पण कोणीतरी जीआरमध्ये हा पाच नंबरचा मुद्दा टाकून दिशाभूल करायचा प्रयत्न केलेला दिसतो. माझी सरकारला विनंती आहे की ह्यामध्ये तातडीने सुधारणा करावी.

काय आहे जीआरमधील पाचवा मुद्दा
शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/