मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायगुण चांगला नाही : नारायण राणे

सिंधुदुर्ग : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्यापासून दैारा आहे. या दैाऱ्याबाबच माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. कणकवली येथी एका भूमिपूजन कार्यक्रमानंतर राणे पत्रकरांशी बोलत होते.

या सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, सरकारचा पायगुण चांगला नाही. सरकारची तिजोरी खाली आहे. हे सरकार दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा नुसत्या घोषणा करीत आहेत.

प्रत्यक्षात मदत मिळालेली नाही. मी नुकताच जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी सांगितले की अद्याप पैसे आलेले नाही. ही परिस्थिती आहे. तरी आम्ही विरोधी पक्ष या नात्याने सरकारला दुष्काळी परिस्थितीत पैसे द्यायला भाग पाडू, असा विश्वास नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

राणे म्हणाले “पुरामुळे राज्यात हाहाकार उडाला आणि आता हे घरातून बाहेर पडत आहेत. मुख्यमंत्री काय पाहणार.. पाहून ते शेतकऱ्यांना काय देणार आहे.. राज्याच्या परिस्थितीचा त्याचा अभ्यास आहे का.. असा निष्क्रिय मुख्यमंत्री

महाराष्ट्रात झाला नाही”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापासून परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची सोलापूर पासून पाहणी करणार करणार आहेत. याचा समाचार नारायण राणे यांनी घेतला. नारायण राणे म्हणाले की मुख्यमंत्र्यांना त्यांचे कर्तव्य माहिती नाही, कोरोनामूळे लोकांचे बळी गेले, तरीही मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाही. राज्याच्या परिस्थितीचा त्याचा अभ्यास आहे नाही