महाजनादेश सभेत मुख्यमंत्र्यांसह सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्‍ती महाराज इंदुरीकर, अनेकांच्या ‘भुवया’ उंचावल्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सध्या पश्चिम महाराष्ट्रात असून नुकतीच हि यात्रा पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात आली होती. यावेळी नगर जिल्ह्यात झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी हजेरी लावल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

युवकांना राजकारणातून बाजूला राहण्याचा उपदेश देणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर राजकीय व्यासपीठावर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आली असता व्यासपीठावर चक्क निवृत्ती महाराज इंदुरीकर लोकांना पाहायला मिळाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन महाराजांचे स्वागत केले.

सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु असून महाराज व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने ते राजकारणात प्रवेश करणार कि काय ? असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यानंतर निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. तसेच त्यांनी कोणतीही राजकीय भूमिका जाहीर केली नाही.

दरम्यान, महाराजांच्या या भेटीनंतर सध्या सोशल मीडियावर फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे भाजप समर्थकांकडून हे फोटो व्हायरल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या फोटोंमध्ये इंदुरीकर महाराज हे भाजपला शुभेच्छा देत असल्याचे देखील दाखवण्यात येत आहे. त्यामुळे ते भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करतात कि नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या