काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

लातूर (औसा) : पोलीसनामा ऑनलाईन – लातूर येथील औसा येथे भाजप शिवसेना महायुतिची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसला टोला लगावला. राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्ष हा कर्णधाराविना लढत आहे. त्यामुळे ते आमच्यासमोर काय टिकणार ? यापुढे लोक मनोरंजनासाठी राहुल गांधींची सभा पाहतील असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना लगावला.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्यांनी कलम ‘१२४ अ’ रद्द करुण टाकण्याच्या गोष्टी केल्या आहेत पण तुम्हाला माहीत आहे का कलम ‘१२४ अ’ काय आहे. कलम ‘१२४ अ’ म्हणजे एखाद्या व्यक्तीने सांगितलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेले संविधान मला मान्य नाही त्याने ते जाळून टाकलं तर त्याला कलम ‘१२४ अ’ अंतर्गत शिक्षा होऊ शकते. आतंकवादी, माओवादी, नक्षलवादी यांना ‘१२४ अ’ च्या अंतर्गत जेलमध्ये डांबता येतं. आणि काँग्रेस पार्टी म्हणते आमचं सरकार आले तर आम्ही कलम ‘१२४ अ’ काढून टाकू. कितीही देशद्रोह झाला तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. या पक्षांना झालं तरी काय आहे ? असा सवाल फडणवीस यांनी केला. केवळ मतांसाठी हे पक्ष असे जाहीरनामे काढत आहेत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, मोदी आणि उद्धवजी जिथे एकत्र येतात तिथे काय गर्दी जमते हे आपण आज पाहत आहोत. आता ही निवडणूक गल्लीतली नसून दिल्लीतली आहे. त्यामुळे देशाचा मानसन्मान राखण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. ही निवडणून भारताच्या आस्मितेची आहे. आमचे सरकार शेतकरयांच्या पाठीशी आहे असे देखील देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like