हरभरा खरेदिबाबत धनंजय मुंढे यांचे मुख्यमंत्र्याना निवेदन

पोलिसनामा ऑनलाईन

राज्यात सध्या शेतक-यांची स्थिती बिकट आहे. भाजीपाला आणि आणि इतर शेतीउत्पादन यांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील हजारो शेतक-यांचा लाखो क्विंटल हरभरा सध्या खरदीअभावी नोंदणी करून देखील पडून आहे. त्यामुळे राज्यातील शेवटच्या शेतक-याचा हरभरा खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवावीत या योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंढे यांनी प्रत्यक्ष मुख्यामंत्र्याना भेटून निवेदनाद्वारे केली.

दरम्यान, मंगळवारी (दि.२९) हरभरा खरेदीचा शेवटचा दिवस होता. नोंदणी करून देखील राज्यातल्या हाजारो शेतक-यांचा लाखो क्विंटल हरभरा पडून आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकट्या जळगाव जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीचा वेग सुरवातीपासून बरा असला तरी अद्याप नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा सुमारे ५२ हजार क्विंटल हरभरा खरेदी झालेला नाही. त्यामुळे पुढे हरभरा खरेदीस मुदतवाढ मिळण्याची मागणी केली जात आहे.

खरेदी ठप्प झाल्याने शेतकऱ्यांनी शेतकी संघाच्या संचालकांकडे तक्रारी केल्या होत्या. या सगळ्या स्थितीत आता मंगळवारी (ता. २९)  खरेदी बंद झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रात हरभरा विक्रीबाबत नोंदणी केली आहे, एकट्या जळगाव येथील सुमारे ५२ हजार क्विंटल हरभरा पडून राहील, असे निश्‍चित आहे. त्यामुळे हरभरा खरेदीला शासनाने तातडीने मुदतवाढ द्यायला हवी. कारण पुढे खरीप हंगाम उभा करायचा असून, बॅंकांनी कर्ज वितरण सुरू केलेले नसल्याने अडचणी वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हरभरा खरेदीसाठी पारोळा, अमळनेर, जळगाव, यावल, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव येथे खरेदी केंद्र सुरू केले होते.

 

You might also like