Homeताज्या बातम्याराज्यातील हिंसाचार बंद व्हावा अशी मुख्यमंत्र्याची इच्छा : नारायण राणे 

राज्यातील हिंसाचार बंद व्हावा अशी मुख्यमंत्र्याची इच्छा : नारायण राणे

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन

राज्यात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. विरोधकांकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर हल्लाबोल होत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली असून राज्यातील हिंसाचार बंद व्हावा, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांची आहे.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’815ae6bc-9196-11e8-a884-db61a9fb168a’] तसेच आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यास सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले, असेही राणेंनी सांगितले. मराठा समाजाचे नेते आणि राणे समितीचे अराज्यात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. विरोधकांकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर हल्लाबोल होत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.ध्यक्ष या नात्याने सरकार आणि मराठा समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मध्यस्थी करण्याचा माझा प्रयत्न असल्याचेही राणेंनी म्हटले.

यावेळी बोलताना ते म्हणाले , मुख्यमंत्र्यांसोबतच मी मराठा समाज आंदोलकांच्या समन्वयकांचीही भेट घेतली. मराठा आरक्षण मिळावे ही माझीही इच्छा आहे. त्यामुळेच माझ्या अंतर्गत नेमलेल्या समितीने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, ते आरक्षण कोर्टाने रद्द केल्याचे राणे यांनी सांगितले. नारायण राणे समितीच्या अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c54b2c58-9196-11e8-96c6-f9b7dd4aa293′]

त्यावर बोलताना ते म्हणाले ,” आम्ही दिलेले  आरक्षण हे तामिळनाडूतील आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले होते. मात्र, सरकार बदलल्यानंतर काही अडचणी आल्या आणि कोर्टाकडून हे आरक्षण रद्द करण्यात आल्याचे राणे यांनी म्हटले. तसेच सरकारने आरक्षणासंदर्भात चुका काढून मराठा समाजाची दिशाभूल करू नये. सर्वोतोपरी प्रयत्न करुन कोर्टाला कागदपत्रे सादर करावीत, असेही राणे म्हणाले.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News