राफेलमुळं भारत चीन-पाकिस्तानवर ‘भारी’ पडणार, वायुसेनेचे प्रमुख भदोरियांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एयर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी सोमवारी भारतीय वायुसेनेच्या नवीन प्रमुख पदाची सूत्रे हातामध्ये घेतली. एयर चीफ बनताच त्यांनी पाकिस्तान आणि चीनला चेतावणी दिली आहे. ते म्हणाले की, राफेलमुळे भारत चीन आणि पाकीस्तानवर आपले वर्चस्व प्रस्थापित करेल.

भदौरिया वायुसेना प्रमुख होताच पुढील आठवड्यात भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात जगातील सर्वात उत्तम असलेलय लढाऊ विमानाचा समावेश होणार आहे. एयर चीफ मार्शल आर .के. एस. भदौरिया राफेल खरेदारीच्या टीमचे चेअरमन देखील राहिलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी 26 प्रकारची लढाऊ विमाने उडवली आहेत.

राफेल ठरणार गेम चेंजर
भदौरिया यांनी सांगितले की राफेलचा वायुसेनेत समावेश होणे ही खूप म्हत्वाची बाबा आहे आणि राफेलची टेकनिक आमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. तसेच ते पुढे म्हणाले सध्या असलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी वायुसेना अगदी तत्पर आहे. आम्ही सतत सीमेवर सुरु असलेल्या घटनांची माहिती घेत असतो त्यामुळे बालाकोटप्रमाणे एअरस्ट्राईक करायला लागले तरी वायुसेना पूर्णपणे तयार असल्याचे वायुसेना प्रमुखांनी सांगितले.

सगळ्या संकटांचा सामना करण्यासाठी तयार
पाकिस्तानकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या अनु हल्ल्याच्या धमकीवर आम्ही कोणत्याही संकटाशी सामना करायला तयार असल्याचे म्हंटले आहे. तसेच आमचे वेगळे काही विचार आहेत आणि आम्हाला जे करायचंय ते आम्ही करू. सध्या सीमेवर तणाव आहे मात्र संकटाशी सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे स्पष्ट मत भदौरिया यांनी व्यक्त केले आहे.

Visit : Policenama.com