‘कोविड-19’ रुग्णालयांवर करणार ‘फुलांचा’ वर्षाव : संरक्षण प्रमुख

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशाचे संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरावणे, एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंह धनोआ, अॅडिमिरल करबीर सिंह यांनी एक पत्रकार परिषद घेतली. कोरोना संकटकाळात पहिल्यांदाच संरक्षण प्रमुखांसहीत तीनही सेनाप्रमुखांसोबत ही पहिली पत्रकार परिषद आहे. यावेळी भारतीय सेना करोना व्हायरसविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत गुंतलेल्या प्रत्येक कोरोना योध्याचं कौतुक करण्यासाठी 3 मे रोजी प्लाय पास्ट करत कोडिड-19 रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करणार आहे, असे सांगण्यात आलंय. या दरम्यान नौसेनेच्या युद्धनौका प्रकाशानं उजळवण्यात येणार आहेत.

देशातील तीनही दल देशात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक कोरोना योध्यासोबत खांद्याला खांदा लावून उभं आहे. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक कोरोना योध्याप्रती आम्ही कृतज्ञ आहोत. आम्ही त्यांना सलाम करतो असेही संरक्षण प्रमुखांनी म्हटलं आहे.

यातील एक फ्लाय पास्ट श्रीनगरपासून सुरु होऊन तिरुअनंतपुरमपर्य़ंत पोहचेल तर दुसरी प्लाय पास्ट आसाममधील दिब्रुगडपासून कच्छपर्य़ंत पोहचेल. भारतीय वायुसेनेचे फिक्स विंग आणि एअरक्राफ्ट या फ्लाय पास्टमध्ये सहभागी होतील. तर नेव्हीचे हेलिकॉफ्टर कोविड 19 रुग्णालयांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करतील. इंडियन आर्मी देशातील जवळपास सर्व जिल्ह्यांतील काही कोविड रुग्णालयासोबत माऊंटेन बँड दाखवतील. पोलीस दलाच्या समर्थनासाठी सशस्त्र दल 3 मे रोजी पोलीस मेमोरिअलवर माल्यार्पण करतील. कोविड-19 मुळे भारतीय सेनेचं कोणत्याही योजनांवर परिणाम झालेला नाही आणि होणार नाही, असा दावा जनरल रावत यांनी यावेळी केला.