संभाजी भिडे ‘अज्ञानी’, राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचे ‘टीकास्त्र’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रभू रामचंद्रांची मूर्ती मिशा असलेली असावी, अशी मागणी करणारे शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी टीका केली. ते सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी म्हटले की, संभाजी भिडे हे अज्ञानी आहेत. त्यांना प्रभू रामाबद्दल माहिती नाही. देव कधी वृद्ध होत नसतो. त्यांचे वय नेहमी 16 वर्षांचे असते. त्यामुळे संभाजी भिडे हे अशाप्रकारची वक्तव्ये करून हिंदू परिवारामध्ये वाद निर्माण करत असल्याचे सत्येंद्र दास यांनी म्हटले. तसेच जर कुठे रामाला मिश्या दाखवल्या गेल्या असतील, तर त्या संभाजी भिडेंसारख्या अज्ञानी लोकांमुळेच, असा प्रहारही सत्येंद्र दास यांनी केला.

संभाजी भिडे यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अयोध्येतील मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करताना सर्व पुरुष देवतांना पुरुषत्वाचे प्रतीक असलेल्या मिशा असाव्यात याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी, असे म्हटले होते.

मिशी ही पुरुषार्थाचे प्रतिक असल्याचे संभाजी भिडे मानतात. त्यांनी या विषयावर भाष्य करताना अयोध्येतील राम मंदिरातील मूर्तीला मिशी लावली जावी ही मागणी केली. मूर्तीला मिशी न लावणे ही मूर्तीकारांची चूक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जर मंदिरात देवाला मिशी नसेल तर अशा मंदिरामध्ये माझ्यासारखा हिंदू जाणार नाही, असे संभाजी भिडे म्हणाले होते. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी संभाजी भिडे यांचा समाचार घेत त्यांचा उल्लेख अज्ञानी असा केला.

प्रभू राम, भगवान कृष्ण आणि भगवान शीव हे हिंदू धर्मातील अतिशय प्रसिद्ध असे देव आहेत. या तिन्ही देवांना कधीही दाढी किंवा मिशी दाखवलेली नाही. याचे कारण म्हणजे या तिन्ही देवांना षोडशवर्षीय दाखवण्यात आले आहे, असे दास यांचे म्हणणे आहे. षोडशवर्षीय म्हणजे 16 वर्षीय. हे देव जो पर्यंत पृथ्वीवर राहतील तो पर्यंत ते कायम 16 वर्षीयच राहणार आहेत. ब्रह्म या देवतेला मात्र 5 मुख आहेत आणि या देवतेला दाढी आणि मिशा दाखवलेल्या आहेत. याचे कारण म्हणजे ब्रह्माचे आयुष्य मर्यादित आहे. मात्र रामाची नेहमीच तरुण अवस्थेतच पूजा केली जाते, असेही सत्येंद्र सास पुढे म्हणाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like