‘कुलदीप – चहल’ अद्यापही संघाचा भाग, निवड समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मोठा खुलासा केला आहे. कुलदीप यादव आणि युझवेन्द्र चहल याला भारताच्या टी-20 संघातून बाहेर का काढण्यात आले यावर त्यांनी भाष्य केले आहे. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपआधी त्यांना अशा प्रकारे संघाबाहेर ठेवणे भारतीय संघासाठी घातक आहे. मात्र ते दोघे भारतीय संघाचा अविभाज्य घटक असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

संघाचे भाग आहेत  दोघे
सलग दोन टी-20 मालिकांमधून बाहेरचा रस्ता दाखवलेल्या दोघांना अजूनही संधी आहे. दक्षिण आफ्रिका आणि विंडीजविरुद्ध बाहेरचा रास्ता दाखवला असला तरी पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपच्या संघात ते असतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर ते अजूनही भारतीय संघाचे भाग असल्याचे देखील यावेळी त्यांनी म्हटले.

युवा खेळाडूंना देणार संधी
आम्ही सध्या टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने युवा फलंदाजांना संधी देत असून त्यादृष्टीने आम्ही तयारी करत आहोत. आमच्याकडे अनेक फिरकी खेळाडू असून दोघांनी संघासाठी अतिशय चांगली कामगिरी केली आहे. हे दोघे वर्ल्डकप संघातील प्रमुख खेळाडू असून आम्ही अजून काही पर्यायांची चाचपणी करत आहोत.

चहर, जडेजा आणि कृणाल पांड्या अडथळा
एमएसके प्रसाद यांनी अधिक बोलताना सांगितले कि,या तीन खेळाडूंच्या समावेशामुळे भारतीय गोलंदाजीमध्ये वैविध्य आले असून या तिघांनी देखील भारतीय संघासाठी उत्तम कामगिरी केली आहे.

Loading...
You might also like