चिखली (पिंपरी-चिंचवड) : सोसायटीच्या पाण्याची टाकी साफ करताना एक मृत्युमुखी

पिंपरी चिंचवड: पोलीसनामा ऑनलाइन
चिखलीतील घरकुल प्रकल्पाच्या मागील आशिर्वाद सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत पडून एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. एका सोसायटीत पाण्याची टाकी साफ करताना पाण्यातून वीज प्रवाह पाण्यात जात असल्याने कामगाराचा मृत्यू झाला.

या घटनेत अमर खिलारे (वय:25) रा.थेरगाव असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे तर सिध्दार्थ काळे (वय:30) दोघेही रा.दगडू पाटील नगर, थेरगाव हे जखमी असून त्यांच्यावर वायसीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.