Chikki Scam Case | चिक्की घोटाळा प्रकरणात आणखी एक नवा ट्विस्ट; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा

बीड : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या काळातील कथित चिक्की घोटाळ्याचे प्रकरण (Chikki scam case) पुन्हा एकदा वर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी ‘माझी मागणी उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) लक्षात घेतलीय. पूर्वीपासून मी सांगत होतो गुन्हा दाखल करा’ अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करत पंकजा मुंडेंवर निशाणा साधला गेला आहे. मुंडे यांच्या काळातील चर्चेत असणाऱ्या चिक्की घोटाळा प्रकरण (Chikki scam case) पुन्हा एकदा वर आले आहे. याप्रकरणी आज (शुक्रवारी) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी झाली आहे. याप्रकरणात अद्याप खासगी पुरवठादारांवर गुन्हा दाखल का केला नाही? असा प्रश्न राज्य सरकारला विचारला गेला आहे.

याप्रकरणावरून धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) म्हणाले की, ‘माझी मागणी न्यायालयाने लक्षात घेतली आहे. आधीपासून मी सांगत होतो गुन्हा दाखल करा. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात देखील गेले होते. त्यामुळे आता सर्व बाबी कोर्टाच्या हळूहळू लक्षात येत आहे’ असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. तसेच, चिक्की घोटाळा निघाल्यापासून माझी वारंवार मागणी आहे की, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे आणि आज नाही दोन वर्षापूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ACB कडे अर्ज केला आहे. सर्व विषय न्यायालयात आहे. म्हणून माननीय न्यायालय (Mumbai High Court) काय निर्णय घेईल ते पाहू’ असं त्यांनी म्हटलं आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

भाजप (BJP) सरकारच्या काळामध्ये 2015 साली चिक्की घोटाळा झाला होता.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळातला हा पहिला सर्वात मोठा घोटाळा (Chikki scam case) होता. 24 कॉन्ट्रॅक्ट 206 कोटी देण्यात आले होते.
सूर्यकांता बचत गटाला 106 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट देत विना टेंडर खरेदी केली होती.
कंत्राट दिलेल्या कंपनी बंद अवस्थेत असल्याचे पुढे आले.
दरम्यान चिक्की निकृष्ट असल्याचं अहमदनगर जिल्ह्यात तक्रार दाखल झाली.
या घोटाळ्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी ACB चौकशी लावली होती.

दरम्यान, विशेष म्हणजे, ACB ने महिला बालकल्याण विभागाला विचारलं (Chikki scam case) घोटाळा झालाय का?
शेवटी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना क्लीन चिट (Clean chit) देण्यात आली होती. 2015 साली हे प्रकरण कोर्टात गेलं.
पंकजा मुंडे यांना क्लीन चिट मिळाली असली तरी दोषी अधिकारी यांच्यावर पंधरा दिवसात गुन्हे दाखल करण्याचं फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र, अद्याप कुणावर गुन्हे दाखल नाहीत.

Web Title : Chikki Scam Case | ncp leader dhananjay munde targets pankaja munde over chikki scam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Pune Corporation | नाना पेठेतील ‘दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन’च्या जागेचा करार वाढवून द्यावा; राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शहर सुधारणा समितीकडे प्रस्ताव

Modi Government | 65 लाख पेन्शनधारकांना मिळाला मोठा दिलासा ! 45 दिवसात प्रकरणे निकाली काढणार, कार्यालयांच्या माराव्या लागणार नाहीत फेर्‍या

Sputnik Light | खुशखबर ! पुढील महिन्यात येतेय ‘सिंगल डोस स्पूतनिक लाईट’ व्हॅक्सीन, जाणून घ्या किती असेल किंमत