बीड : वंशाच्या दिव्यासाठी काय पण ! आई जवळून ‘मुला’ चे अपहरण करून ठेवली ‘मुलगी’

बीड : (अंबेजोगाई) : पोलीसनामा ऑनलाइन – वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी कोण कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. अंबेजोगाईमध्ये वंशाच्या दिव्यासाठी चक्क सहा दिवासांच्या मुलाचे त्याच्या आईजवळून अपहरण करुन तिथे मुलीला ठेवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील स्वामी रमानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाच्या प्रसूती पश्चात कक्षातून सहा दिवसांचे जन्मलेल्या पुरुष जातीच्या बाळाची चोरी करण्यात आली. त्याच वेळी रुग्णालयातील दुसऱ्या वार्डात एका महिला स्त्री जातीचे नवजात अर्भक ठेऊन पसार झाली आहे. वंशाच्या दिव्यासाठी हे कृत्य केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहेत. रुग्णालयातील सीसीटीव्ही बंद असल्याचने पोलिसांना तपास कामात अडथळा येत आहे.

धारुर येथील सैफ शेख यांची पत्नी सफिना या प्रसूतीसाठी अंबेजोगाईच्या स्वारती रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. बुधवारी सायंकाळी सात वाजता त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांचे सीझर झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयातील वार्ड नंबर 6 मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज (सोमवार) सकाळी अकराच्या सुमारास त्यांचे नातेवाईक काही वेळासाठी बाहेर गेले होते. बाराच्या सुमारास सोफिया यांना झोप लागली. त्यावेळी बाळ सोफिया यांच्या कुशीत झोपले होते. एकच्या सुमारास त्यांना जाग आली असता त्यांना धक्काच बसला. त्यांचे बाळ त्यांच्या जवळ नव्हते.

त्यावेळी बाहेर गेलेले नातेवाईक परत आले. बाळ नसल्याचे समजल्यावर त्यांनी बाळाचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, बाळाचा शोध लागला नाही. दरम्यान, एक महिला रुग्णालयातील वार्ड क्रमांक 8 मध्ये आली. प्रसाधनगृहात जाण्याचा बहाणा करत तिने स्वत:जवळील अर्भक एका महिलेजवळ ठेवले आणि पसार झाली. महिलेजवळ ठेवलेले अर्भक स्त्री जातीचे होते. रुग्णालय प्रशासनाने स्त्री जातीचे अर्भक ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबेजोगाई शहर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.

या दोन्ही घटनाचा एकमेकांशी काही संबंध आहे का याचा शोध पोलीस घेत असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्या महिलेनेच मुलाच्या हव्यासापोटी मुलगी ठेऊन ते बाळ चोरून नेले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे स्वाराती रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like