विधीसंघर्षीत बालकाकडून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – जवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जबरी चोरी करणाऱ्या विधीसंघर्षीत बालकास गुन्हे शाखा, युनिट चारच्या पथकाने अटक करुन गुन्हा उघडकीस आणला. पुणे बेंगलोर महामार्गावर वाटसरुंना अडवून मोबाईल व रोख रक्कम जबरदस्ती करुन काढून घेतला. याचा तपास गुन्हे शाखा करीत असताना यातील चोरीस गेलेला मोबाईलची माहिती मिळाली. मोबाईल वापरत असलेल्या विधीसंघर्षीत बालकास क्रांती चौक, सांगवी येथुन ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने साथीदार गणेश हनुमंत मोटे व एक विधीसंघर्षीत बालक यांच्यासह हिंजवडी येथे मोटारसायकलवर येवून चोरी केल्याची कबुली दिली. विधीसंघर्षीत बालक व त्याचे साथीदार यांच्यावर यापूर्वी सांगवी पोलीस स्टेशन, चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन, चिखली पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी, बेकायदेशीर जमाव जमवून दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील ताब्यात घेण्यात आलेल्या विधीसंघर्षीत बालकासह आणखी एक विधीसंघर्षीत साथीदार हा हितेश मुलचंदानी याच्या खुनामध्ये आरोपी आहे.

हि कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे श्रीधर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी नारायण जाधव, धर्मराज आवटे, संजय गवारे, लक्ष्मण आढारी, मयुर वाडकर, वासुदेव मुंढे, अदिनाथ मिसाळ व सुनिल गुट्टे यांनी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –