‘शेपूट’ असलेलं मुल जन्माला आलं, हॉस्पीटलमध्ये पाहण्यासाठी झाली ‘तोबा’ गर्दी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्रेटर नोएडाच्या दनकौरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका महिलेने एका मुलाला जन्म दिला आहे. परंत त्याच्या कमरेच्या खालच्या भागावर शेपटीसारखा एक मांसल भाग दिसत आहे. हे पाहून त्या बाळाचे नातेवाईक आणि डॉक्टरही हैरान झाले आहेत.

ही गोष्ट जशी रुग्णालयात पसरली तेव्हा सगळे कर्मचारी त्या बाळाला पाहण्यासाठी जमा होऊ लागले. शेपूट असलेलं जन्माला आलेलं बाळ लोक चकित होऊन पहात होते.

या बाळाबद्दल सांगताना डॉक्टर म्हणाले, “कंजेनाईल नार्मलिटीमुळे हे असं झालं आहे. हे फक्त एक ते दोन टक्के लोकांमध्येच आढळून येते. त्यामळे केस जास्त होणं, कानात काहीतरी प्रॉब्लेम किंवा इतर एखाद्या अंगात असं काहीतरी होतं.”

सीएमओ डॉक्टर अनुराग भार्गव म्हणाले, “सध्या तरी हे बाळ पूर्णपणे निरोगी आहे. त्याला स्तनपानही सुरू आहे. हे एका प्रकारचं सैकोकोकीगल टेराटोमा प्रोव्हिजनल डायग्नोसिस आहे जे फक्त एक ते दोन टक्के मुलांमध्ये आढळून येतं. यामुळे कोणताही धोका नसतो. लवकरच त्या बाळाला रुग्णालयात आणून एमआरआय करून तो मांसाचा तुकडा वेगळा केला जाईल. याचा मुलाच्या आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नाही.