धक्कादायक ! मोबाइल चार्जरची पिन तोंडात गेल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – लटकत्या मोबाइल चार्जरची पिन तोंडात गेल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली  आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये हा प्रकार घडला आहे. सहवर अहमद हुसैन असं या चिमुकल्याच नाव आहे. रमजान  इफ्तारीच्या दावतसाठी गेले असताना हा  प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,  मोबाइलचा चार्जर हा प्लगमध्ये लावला होता. त्याची वायर खाली लटकत होती. लटकत असलेल्या चार्जरची  पिन चिमुकल्याने खेळता खेळता  तोंडात घातली . पिन तोंडात गेल्यामुळे स्फोट झाला. त्यात तो जखमी झाला.  जखमी चिमुकल्याला  तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारापूर्वीच  त्याच्या मृत्यू झाला.

मोबाइलचा स्फोट झाल्यामुळे किंवा मोबाइला चार्जिंगला असताना त्याचा स्फोट झाल्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत.मोबाइल किंवा चार्जर लहान मुलांच्या हातात देऊ नका. मुलांना इलेक्ट्रोनिक वस्तुंपासून लांब ठेवा अशा सूचना वारंवार देण्यात येतात. पण पालक त्याकडे  दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा घटना घडत आहेत.