मुलाने हवेत दाखविली अशी ‘करामत’, लोक म्हणाले – ‘भविष्यातील गोल्ड मेडलिस्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक छोटा मुलगा आश्चर्यकारक स्टंट करत आहे. मुलाचे स्टंट पाहून आजूबाजूचे लोक अवाक झाले आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लोक भरभरून कमेंट्स देत आहेत. हा व्हिडिओ ट्विटर यूजर रुक्षमणि कुमारीने शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘जिमनास्टिकमध्ये फ्यूचर गोल्ड मेडलिस्ट’. यानंतर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला.

व्हिडिओमध्ये दिसते की, मुलगा वाळूच्या ठिकाणी खेळत आहे, आजूबाजूला बरेच लोक आहेत. मग एक मुलगा एका बाजूने धावत यतो आणि स्टंट करू लागतो. प्रथम त्याने हवेत उडी मारली. उडी मारताच मुलगा हवेत कसरती करू लागला. यानंतर तो पुढे गेला, त्यानंतर तेथे पुन्हा हवेत कसरती दाखविण्यास सुरवात केली. कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनविला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ स्लो मोशनमध्ये आणखी सुंदर दिसत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक तो शेअर करत आहेत आणि लाईक्स करत आहेत. काही ट्विटर यूजर्सही या मुलाला पुढे नेण्याविषयी बोलत आहेत. त्याचबरोबर काही लोकांनी क्रीडामंत्र्यांना टॅग करुन या मुलाला प्रशिक्षण देण्याची विनंती केली आहे.