पॉकेट चोरी उघड केल्याने बालकाचा दगडाने ठेचुन खून

जिंतूर (परभणी ) : पोलीसनामा ऑनलाईन
लग्नामध्ये एकाचे पॉकेट चोरल्याचे सांगितल्याच्या कराणावरुन ७ वर्षाच्या बालकाचा दगडाने ठेचुन खून केल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे घडली आहे. सात वर्षाच्या मुलाने पॉकेट चोरल्याचे सांगितल्याने खून करणाऱ्या अल्पवयीन मुलाला नागरिकांनी बेदम मारहाण केली होती. याच रागातून अल्पवयीन मुलाने त्याचा खून केला. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी २४ तासात ताब्यात घेतले आहे.
युवराज जाधव (वय -७ रा. शिवाजीनगर, जिंतूर) असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी युवराजच्या भावाच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
युवराज जाधव याचा गुरुवारी (दि.२०) शहराच्या बाहेर मृतदेह आढळून आला होता. युवराजचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याने याबाबत शहरात खळबळ उडाली होती. मुलाचा खुन झाल्याचे सांगत युवराजच्या वडिलांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेर्डीकर, पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, उप निरीक्षक सुरेश नरवडे, सुनील अवसारमोल यांनी तपासाला सुरुवात केली.
मयत युवराज दिवसभर कोठे आणि कोणासोबत होता याचा तपास करत असताना त्याच्या घराजवळ असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो एका मुलासोबत दिसला. सीसीटीव्हीमध्ये असलेल्या युवकाची माहिती घेतली असता तो युवराजच्या मोठ्या भावाचा मित्र असल्याचे समजले. पोलिसांनी त्याचा सोध गेऊन आज सकाळी आठ वजाता अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.त्याची कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. आरोपी हा विधीसंघर्षग्रस्त असून त्याने या पूर्वीसुद्धा युवराजला मारण्याचे प्रयत्न केले असल्याची कबुली दिली.
भावाशी मैत्री करुन काढला काटा