कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये ‘विश्वास’ आणि ‘स्मितहास्य’ यांचा अतूट ‘संगम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी पूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. जम्मू आणि श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू आहे आणि बर्‍याच भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. दरम्यान तिथून असे एक सुंदर चित्र समोर आले आहे जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. या चित्राकडे जम्मू-काश्मीरमधील शांततेचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.

काश्मीर घाटीत तैनात असणारी सीआरपीएफची महिला सुरक्षा रक्षक कर्मचारी स्थानिक मुलाशी हात मिळवत असतानाच हा फोटो आहे. या फोटोविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु असून दूरदर्शन आणि प्रसार भारती यांनी गुरुवारी आपल्या ट्विटर हँडलवर सीआरपीएफ जवानचा हा फोटो शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले आहे की हा ‘विश्वास’ आणि ‘स्मितहास्य’ यांचा अतूट संगम आहे. यानंतर हे ट्विट प्रचंड प्रमाणावर शेअर झाले असून नेटकऱ्यांनी याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

कलम ३७० लागू केल्यानंतर काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितिच्या पार्शवभूमीवर हा फोटो आशादायी ठरत आहे आणि काश्मीरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन प्रेरणा देत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाला संबोधित करताना काश्मीरमधील परिस्थिती लवकरच सामान्य होईल अशी आशा व्यक्त केली आहे. काश्मिरींना बकरी ईद साजरी करण्यात काही अडचण येणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पीएम मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे काश्मीरचा विकास होईल आणि प्रगतीचे नवे मार्गही उघडले जातील. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी काश्मीरमधील लवकर निवडणुका होतील असे सांगत तरुणांना प्रतिनिधीत्व करण्याची प्रेरणा देखील दिली.

आरोग्यविषयक वृत्त