उभ्या असलेल्या गाडीचं ‘स्टार्ट’ बटन दाबलं मुलीनं, दुकानात ‘घुसलं’ वाहन अन् ‘उकळतं’ तेल पडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील झाशीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका मिठाईच्या दुकानामध्ये गरम तेल मुलीच्या अंगावर उडाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती मिठाईच्या दुकानात खरेदीसाठी आले होते. त्यावेळी त्याने गाडी उभी केली असता या व्यक्तीच्या मुलीने गाडीचे एक्सलेटर फिरवले असता गाडी थेट या मिठाईच्या दुकानात शिरली.

खड़ी गाड़ी को बच्ची ने क‍िया स्टार्ट, दुकान में घुसी, ग‍िरा खौलता तेल

यामुळे समोर असलेला जिलेबीचा पाक आणि गरम तेल या मुलीच्या अंगावर उडाले. हि सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या गरम तेलामुळे आणि पाकामुळे मुलगी मोठ्या प्रमाणात भाजली आहे. यानंतर स्थानिकांनी या मुलीला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, हि मुलगी मोठ्या प्रमाणात भाजली असून तिच्यावर दवाखान्यात उपचार सुरु असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

खड़ी गाड़ी को बच्ची ने क‍िया स्टार्ट, दुकान में घुसी, ग‍िरा खौलता तेल

Visit : Policenama.com